पीजी मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

कधी होणार होत्या या परिक्षा
पीजी मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई: आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून (health science univercity) जून महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर (पीजी मेडिकल)परीक्षा (Pg medical exam) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासाठीची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी आज दिली. या परीक्षा प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून नवीन सुधारीत वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचेही डॉ. पाठक यांनी स्पष्ट केले आहे. (Pg medical exam postponed)

तर दुसरीकडे विद्यापीठाकडून 2 जून पासून पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू केल्या जाणार असून त्यात कोणताही बदल तुर्तास करण्यात आला नाही, यामुळे विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

पीजी मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
46 वर्षानंतर पारसी क्रिकेटरला मिळाली टीम इंडियात संधी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून 24 जून पासून उन्हाळी 2021 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले हेाते. मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पीजीला असलेल्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com