रुग्णांच्या जीवाशी खेळ! फार्मासिस्ट शिवाय औषधी दुकाने सुरू

मिलिंद तांबे
Friday, 11 September 2020

राज्यभरातील 3 हजाराहून अधिक औषधांच्या दुकानांमध्ये नोंदणीकृत विक्रेते (फार्मासिस्ट) नाहीत. एवढेच नव्हे तर 118 विक्रेते एकाच वेळी दोन ठिकाणी काम करत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : राज्यभरातील 3 हजाराहून अधिक औषधांच्या दुकानांमध्ये नोंदणीकृत विक्रेते (फार्मासिस्ट) नाहीत. एवढेच नव्हे तर 118 विक्रेते एकाच वेळी दोन ठिकाणी काम करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत ऑल इंडीया फूड एँड लायसेंस होल्डर असोसिएशनने अन्न व औषध प्रशासन विभागाला तक्रार करून कारवाईची मागणी केला आहे. 

येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या इंजिनिअर तरुणींची सुटका; भाजप कार्यकर्त्यांची कामगिरी

राज्यातील महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलद्वारे मान्यता प्राप्त 118 नोंदणीकृत फार्मासिस्ट एकाच वेळी दोन भिन्न औषधी दुकानांमध्ये एकाच वेळी कार्यरत असल्याचे ऑल इंडीया फूड अँड लायसेंस होल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. दुसरीकडे राज्यातील 3543 औषधी दुकानांमध्ये एकही फार्मसिस्ट कार्यरत नसल्याचेही पांडे म्हणाले. ही माहिती अन्न व औषधी प्रशासनाच्या संकेतस्थळावरच उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आतापर्यंत प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नसल्याचे पांडे यांनी सांगितले.  

मराठा समाजाला शिक्षण, रोजगारासाठी सवलती द्या! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

अशाप्रकारे फार्मासिस्ट आणि औषधी दुकानांचे चालक औषध कायद्याचे उल्लंघन करीत राज्यातील कोट्यवधी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. याबाबत अनेक तक्रारीही करूनही यावर कारवाई करण्यात आलेली नाही. प्रत्येक औषधाच्या दुकानात महत्वाची औषधी असतात. त्याची योग्य माहिती ही केवळ फार्मासिस्टला असते. इतरांकडून एखादी चूक झाल्यास रूग्णाच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती असोसिएशनने केली आहे.

 

औषध विक्रेत्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. तक्रारींची खातरजमा करत आहोत. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
 - अरूण उन्हाळे,
आयुक्त, अन्न व औषध प्रशसासन

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pharmacies are running without pharmacists