त्या फिलिपाईन्सच्या नागरिकाला कोरोना नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मुंबई : जपानच्या बंदरातील क्रुझमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याचा विषय जगभरात चर्चीला जात असतानाच मुंबई बंदरात आलेल्या एका फिलिपाईन्स देशाच्या जहाजावरील कर्मचाऱ्यामध्येही कोरोना विषाणूचे लक्षणे दिसत होती; मात्र मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या तपासणीत या फिलिपाईन्सच्या नागरिकाला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे उघड झाले आहे.

शरीरात रक्‍ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देऊ... कोण बोलले हे?

मुंबई बंदरात शुक्रवारी दाखल झालेल्या या कर्मचाऱ्यामध्ये सौम्य ताप, सर्दी खोकला अशी लक्षणे होती. त्यामुळे या कर्मचाऱ्याला इतर कर्मचाऱ्यांपासून वेगळे करून त्यांच्या रक्ताचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात तपासण्यात आले. यात त्याला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे उघड झाले. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. हे जहाज आता पोरबंदरला पोहचले आहे. 

अलिबाग-पेण मार्गावरील अपघातात दोन ठार... कसा झाला अपघात?

राज्यातील विविध रुग्णालयात आतापर्यंत 60 संशयित जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील 56 जणांना कारोनाची बाधा नसल्याचे उघड झाले आहे; तर 50 जणांना आतापर्यंत घरी पाठविण्यात आले. अद्याप नऊ जण उपचार घेत आहेत. यात मुंबई, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी तीन रुग्ण आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्ण आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 

That Philippines citizen has no Corona

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That Philippines citizen has no Corona