तत्त्वज्ञानाचे अध्यापक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

- प्रा. पीटर सोतेर्जिक, तत्त्ववेत्ते, लेखक

ज र्मनीतील कार्लस्‌ऱ्हूमध्ये १९४७ मध्ये जन्मलेले प्रा. सोतेर्जिक यांनी म्युनिकमधून तत्त्वज्ञान आणि जर्मनी स्टडीजमधून अध्ययन केल्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी हॅम्बर्गमधून डॉक्‍टरेट संपादन केली. धार्मिक आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञान, टाइम डायग्नॉस्टिक्‍स, कला आणि मानसशास्त्र या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. १९८० पासून ते मुक्त लेखन करत आहेत. कार्लस्‌ऱ्हूमधील विद्यापीठात १९९२ पासून ते तत्त्वज्ञान आणि माध्यम तत्त्वज्ञानाचे (मिडिया थिअरी) अध्यापन करत आहेत.

न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध बार्ड महाविद्यालयासह पॅरिस आणि झुरीकमधील मान्यवर संस्थांमध्येही ते तत्त्वज्ञान शिकवतात. व्हिएन्नातील ॲकॅडमी ऑफ फाइन आर्टस्‌मधील सांस्कृतिक तत्त्वज्ञान संस्थेचे संचालक आहेत. निबंधलेखनाबद्दल त्यांना १९९३ मध्ये अर्नस्ट रॉबर्ट कर्तिस आणि २००० मध्ये फ्रेडरिक मेकर पारितोषिकांनी सन्मानित केले आहे. २००१ मध्ये त्यांना तत्त्वचिंतनाबद्दल, तर २००५ मध्ये वैज्ञानिक लेखनाबद्दल सिग्मंड फ्राईड पारितोषिकांनी सन्मानित केले आहे. फ्रान्सच्या सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

विधायक कार्याला दिशा

- अँथनी फार, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲलन ग्रे आर्बिस फाउंडेशन

ॲ लन ग्रे यांच्या साक्षेपी दृष्टिकोनातून ॲलन ग्रे ऑर्बिस फाउंडेशनची निर्मिती झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत विधायक कार्य करणाऱ्या या फाउंडेशनला ॲलन ग्रे लिमिटेड आणि आर्बिस इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट यांच्या सहकार्यातून निधी उपलब्ध होतो. कंपनीच्या नफ्याच्या ७ टक्के रक्कम या निधीत येते, त्यात मोठ्या प्रमाणात तफावत येऊ नये म्हणून खास व्यवस्था केलेली आहे. फाउंडेशनच्या कार्याने अँथनी प्रेरित झालेले आहेत. फाउंडेशनच्या कार्याला योग्य दिशा देऊन कार्यपूर्तीसाठी ते कसोशीने प्रयत्न करत असतात. त्यात सहभागी मंडळींना सातत्याने कार्यप्रवण ठेवण्यासाठी ते नवनवीन कल्पनांचा वापर करत असतात.

Web Title: philosophy teacher