esakal | काय ? चक्क कबुतरही पळतोय लॉकडाऊनचे नियम? आता हे काय नवीन...
sakal

बोलून बातमी शोधा

काय ? चक्क कबुतरही पळतोय लॉकडाऊनचे नियम? आता हे काय नवीन...

गेले 25 दिवस सोडले नाही घरटे 

काय ? चक्क कबुतरही पळतोय लॉकडाऊनचे नियम? आता हे काय नवीन...

sakal_logo
By
मयुरी चव्हाण काकडे

कल्याण  : सध्या  मुंबई सह ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरात केवळ कावळे आणि कबुतर हे दोनच पक्षी प्रामुख्याने  शिल्लक राहिले आहेत. सध्या  सर्वत्र लॉकडाऊन असूनही अनेक  नागरिक विनाकारण  घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.  मात्र अनेकदा माणसापेक्षा मुके प्राणी शहाण्यासारखे वागतात असे बोलले जाते. याचा प्रत्यय बदलापुरात आला आहे. येथे एका इमारतीच्या खिडकीमध्ये जणू काही "Stay At Home " असा निश्चय करत  चक्क एका कबुतराने गेल्या 25 दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. 

मोठी बातमी - राज्य आणि केंद्राबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणालेत...

बदलापूर पूर्वेकडील समर्थ नगर परिसरात मेघना पार्क या गृहसंकुलात ऍड प्रदीप पाटील यांचे घर आहे. काही दिवसांपूर्वी अचानक एक कबुतर त्यांच्या खिडकीच्या ग्रील मधून आत आले ते पुन्हा परत गेलेच नाही. अन्नाच्या शोधत कबुतर आले असावे असा विचार करून  पाटील कुटूंबीयाने त्याला  पहिल्या दिवशी जाणकारांचा सल्ला घेऊन  अन्न पाणी दिले. एव्हाना कबुतर गेले असावे असा अंदाज पाटील यांनी लावला मात्र  त्यांचा अंदाज खोटा ठरला. मग काय, रोजच कबुतराची खातीरदारी करण्याचा दिनक्रम सुरू झाला . पाहता पाहता कबुतराने इवलेसे  घरटेही बांधले आणि दोन अंडीही दिली. 

मोठी बातमी -  Coronavirus : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण

आसपासच्या परिसरातुन येणारे इतर पक्षांचे आवाज, बसण्यासाठी गोणपाट ,शेजारीच पाणी भरून ठेवलेले भांडे आणि मुख्य म्हणजे गॅलरीत मिळालेली सावली यामुळे हे कबुतरही जणू काही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लॉकडाऊनचे पालन करत असून पाटील कुटूंबियही घरातील सदस्याप्रमाणे त्याची देखभाल करत आहेत. 

कबुतरामुळे श्वसन व इतर आजार बळावत असल्याचा सल्ला मित्रांनी दिला. मात्र आम्ही योग्य ती काळजी घेऊन देखभाल करत आहोत. सध्या मनुष्यप्राणी सगळे समजून सुद्धा कायदे मोडत आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांकडून माणसाने आता शिकले पाहिजे - ऍड  प्रदीप पाटील.

pigeons are also following rules of quarantine read amazing story about birds and corona

loading image