( #TikTok ) टिकटॉकवर पुन्हा येणार बंदी ?

( #TikTok ) टिकटॉकवर पुन्हा येणार बंदी ?

तरुणाई टिकटॉक अॅपच्या प्रचंड प्रेमात आहे. अशात कदाचित ही बातमी त्यांच्यासाठी फार चांगली नाही. टिकटॉक अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात टिकटॉक विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हीना दरवेश नामक या मुंबईतील महिलेने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. हीना यांनी TikTok मुळे जागतिक पातळीवर भारताचं नाव खराब होत असल्याचं देखील म्हटलंय. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड फेमस असणाऱ्या #TikTok वर आता मुंबई उच्च न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.  

#TikTok कायमच त्यावर अपलोक होणाऱ्या अश्लील व्हिडीओंमुळे चर्चेत राहिलंय. यापूर्वी  मद्रास उच्च न्यायालयाने यावर देशभरात बंदी घालण्याचे आदेश केंद्राला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश  कायम ठेवले होते. यानंतर गूगल आणि अॅपल वरून हे अॅप कडून टाकण्यात आलं होतं. कालांतराने ही बंदी उठवल्याने टिकटॉक आणि तरुणाईला दिलासा मिळाला होता.  

'बाइट डान्स' नामक कंपनीनं २०१६ साली हे अॅप लाँच केलं. गाणी किंवा सिनेमांच्या डायलॉगवर तरुणाई लहान व्हिडीओ बनवून या अॅपच्या माध्यमातून  सोशल मीडियावर शेअर करत असते. टिक-टॉक हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशन  २०१८ मध्ये अमेरिकेत सर्वाधिक डाउनलोड होणारं अॅप ठरलंय. 1.5 अब्ज लोकांनी TikTok अॅप्लिकेशन डाऊनलोड केलंय. 

Webtitle : PIL against Tik Tok app regesteref in mumbai high court

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com