Navy: आरबी समुद्रात नौदलाने कसली कंबर; मच्छीमार नौकांची केली तपासणी

Indian Navy
Indian Navy sakal

अरबी समुद्र तसेच आखाती समुद्रातील चाचेगिरीच्या घटना पाहता तेथे भारतीय नौदल सज्ज असून गेल्या आठवड्यात भारतीय नौसैनिकांनी भरसमुद्रात अनेक मच्छीमार नौकांवर उतरून त्यांची तपासणी केली आहे.

भारतीय नौदलाच्या प्रसिद्धी पत्रकात नौदलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. एडनचे आखात तसेच उत्तर-मध्य अरबी समुद्रात भारतीय युद्धनौका आणि लढाऊ विमाने तैनात असून नौदलाच्या लांब पल्ल्याच्या टेहळणी विमानांची देखरेखही सुरू आहे. कोणत्याही प्रकारची टेहळणी तसेच सुरक्षाविषयक कारवायांसाठी नौदल सज्ज असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Indian Navy
Indian Navy : नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द; कतारमध्ये भारताच्या मुत्सद्देगिरीला मोठं यश

व्यापारी जहाजे विशेषतः भारतीय व्यापारी जहाजांच्या सुरक्षेवर नौदलाचे विशेष लक्ष आहे. देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात टेहळणीसाठी नौदलाने तटरक्षक दलाशी समन्वय साधला आहे. राष्ट्रीय सागरी संस्थांच्या समन्वयाने नौदल एकंदर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या विभागातील व्यापारी जहाजे तसेच प्रवासी जहाजे यांच्या सुरक्षिततेसाठी नौदल सज्ज असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Indian Navy
Indian Navy : नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द; कतारमध्ये भारताच्या मुत्सद्देगिरीला मोठं यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com