

मुंबई : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील सर्व प्रमुख अडथळे दूर झाले असून मिठागर जमीन हस्तांतरण तसेच सीआरझेड आणि वन पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या मिळाल्याने हा प्रकल्प जलदगतीने होईल, तसेच बोरिवली-ठाणे बोगदा प्रकल्पाचे काम दोन महिन्यांत सुरू होईल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी येथे जाहीर केले.