रेल्वे म्युझियमचा गाशा गुंडाळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सीएसएमटी स्थानकात जागतिक रेल्वे म्युझियम उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. म्युझियमवर इतका निधी खर्च करणे योग्य नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मुंबई : रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सीएसएमटी स्थानकात जागतिक रेल्वे म्युझियम उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. म्युझियमवर इतका निधी खर्च करणे योग्य नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

सीएसएमटी स्थानकातील मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर म्युझियम उभारण्यात येणार होते. त्यासाठी आर्थिक संकल्पात देखील तरतूद करण्यात आली होती. यासाठी 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. याऐवजी डिजिटल वास्तू संग्रहालय उभारण्याचे सुचवण्यात आले आहे.

Web Title: plan of railway museum cancels