हवामानानुसार नियोजन करा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई - पूर्व-भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या आठवड्यात राज्यातील काही भागांत पावसाची शक्‍यता आहे; तर काही भागांत पाऊस पडणार नाही, असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मुंबई - पूर्व-भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या आठवड्यात राज्यातील काही भागांत पावसाची शक्‍यता आहे; तर काही भागांत पाऊस पडणार नाही, असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

16 ऑगस्टपर्यंत पूर्व-विदर्भात हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. परंतु, पश्‍चिम-विदर्भ, उत्तर-मराठवाडा आणि जळगावमध्ये केवळ हलक्‍या पावसाच्या सरींची थोडी शक्‍यता राहील. उर्वरित मराठवाडा, खानदेश आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात किमान ऑगस्टपर्यंत तरी चांगला पाऊस अपेक्षित नाही. दरम्यान, कोकणात हलका पाऊस सुरू राहील, पण बहुतांश मध्य-महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये चांगल्या पावसाची शक्‍यता कमी राहणार असल्याचा अंदाजदेखील हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच भागांत उष्णता कायम राहील. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Plan by weather