प्लास्टिक बंदीविरोधी मुख्यमंत्र्यांना साकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - राज्यात लागू झालेल्या प्लास्टिक बंदीला तीन महिने मुदतवाढ मिळावी, या मागणीसाठी सोमवारी प्लास्टिक उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई - राज्यात लागू झालेल्या प्लास्टिक बंदीला तीन महिने मुदतवाढ मिळावी, या मागणीसाठी सोमवारी प्लास्टिक उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ऍण्ड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी प्लास्टिक उत्पादकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. प्लास्टिक बंदी आणि त्यावरील दंडात्मक कारवाईचा बडगा छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांवर उगारला जात असल्याबद्दल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. प्लास्टिक बंदीविरोधात आज पुण्यात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. उद्या नागपूरमधील बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन व्यापारी आणि प्लास्टिक उत्पादकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणीही अग्रवाल यांनी केली. 

Web Title: Plastic manufacturers and traders met Chief Minister