प्लास्टिकविरोधी कारवाई थंडावली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

मुंबई - राज्य सरकारच्या प्लास्टिकविरोधी कारवाईने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. आता कारवाई थंडावल्याने किरकोळ विक्रेते निर्धास्त झाले आहेत. प्लास्टिकचा वापर पुन्हा सर्रास सुरू झाला आहे. प्लास्टिकविरोधी कारवाई करणाऱ्या निरीक्षकांशी वादावादीचे प्रसंगही वाढत आहेत. त्यामुळे निरीक्षक आता पोलिस संरक्षणाची मागणी करत आहेत.

मुंबई - राज्य सरकारच्या प्लास्टिकविरोधी कारवाईने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. आता कारवाई थंडावल्याने किरकोळ विक्रेते निर्धास्त झाले आहेत. प्लास्टिकचा वापर पुन्हा सर्रास सुरू झाला आहे. प्लास्टिकविरोधी कारवाई करणाऱ्या निरीक्षकांशी वादावादीचे प्रसंगही वाढत आहेत. त्यामुळे निरीक्षक आता पोलिस संरक्षणाची मागणी करत आहेत.

प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर कारवाईसाठी मुंबई महापालिकेने निरीक्षक नियुक्त केले. कारवाईदरम्यान अनेक  ठिकाणी वादावादीचे प्रसंग ओढवत आहेत. निरीक्षक सततच्या वादावादीला कंटाळले आहेत. काही ठिकाणी कारवाईत जाणीवपूर्वक अडथळा आणला जात आहे. काही ठिकाणी दमदाटी-दादागिरी करून कारवाईला विरोध केला जात आहे, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. 

कारवाई करणाऱ्या निरीक्षकांना धक्काबुक्की किंवा हल्ला झाल्यास कारवाईदरम्यान त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. महापालिकेकडून सर्व २४ विभागांत जोरदार कारवाई सुरू आहे. सुरुवातीला कारवाई धडाक्‍यात झाली. कारवाईचा वेग मंदावल्याने व्यापारी प्लास्टिकचा सर्रास वापर करत असल्याचे चित्र सध्या मुंबईतील बाजारपेठेत आहे.

३८ लाखांचा दंड वसूल
निरीक्षकांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३८ लाख रुपये इतका दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. कारवाईचे अधिकार दिलेल्या निरीक्षकांची नावे व मोबाईल क्रमांक महापालिकेच्या वेबसाईटवर दिले आहेत. निरीक्षकांकडून व्यावसायिक, दुकानदारांवर छापा टाकून ही कारवाई केली जात आहे. कारवाईदरम्यान पहिल्याच वेळी करण्यात येणाऱ्या पाच हजारांच्या दंडामुळे मोठी रक्कम जमा होत आहे.

अजूनही संभ्रम कायम
प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला एक महिना पूर्ण होत आला तरी त्याबाबत जनजागृती झालेली नाही. बंदीबाबत पालिका प्रशासन आम्हाला विचारात घेत नाहीत. हा आमचा अपमान आहे, असा आक्षेप नगरसेवक घेत आहेत. रिटेल व्यावसायिकांना प्लास्टिकबंदीतून सूट दिली; मग फूल व्यावसायिकांना का नाही? पालिकेकडून हा दुजाभाव का? प्लास्टिकबंदी फक्त सर्वसामान्यांसाठी आहे, का असा सवाल विचारला जात आहे.

Web Title: plastic oppose crime stop