"नदीत आठवड्याला 300 किलो प्लॅस्टिक'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई- दहिसर नदीत दर आठवड्याला प्लॅस्टिकचा 300 किलो वजनाचा कचरा सापडत असल्याची माहिती "रिव्हर मार्च'चे प्रमुख गोपाल झावेरी यांनी "सकाळ'ला दिली.

मुंबई- दहिसर नदीत दर आठवड्याला प्लॅस्टिकचा 300 किलो वजनाचा कचरा सापडत असल्याची माहिती "रिव्हर मार्च'चे प्रमुख गोपाल झावेरी यांनी "सकाळ'ला दिली.

मुंबईतील प्रमुख चार नद्यांपैकी एक असलेल्या दहिसर नदीच्या काठावर मानवी वस्ती वाढल्यामुळे तिचा नाला झाला. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावणाऱ्या या नदीच्या पात्रात धोबीघाट सुरू आहे. तबेल्यांतील शेण-मूत्र नदीत सोडले जाते. प्लॅस्टिकचा कचरा आणि सांडपाणीही सोडले जाते. झावेरी आणि त्यांचे सहकारी नदीतील प्लॅस्टिक दर आठवड्याला उचलतात. ही मोहीम स्थानिक पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने दीड वर्षापासून सुरू आहे. बोरिवलीतील रहिवासी असलेले गोपाल झावेरी प्लॅस्टिक बंदीसाठी पाच वर्षे लढा देत आहेत.

एप्रिलमध्ये नदीच्या स्वच्छतेसाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. त्या वेळी तीन टन प्लॅस्टिक कचरा आम्ही जमा केला आणि पालिकेकडे दिला, असे झावेरी यांनी सांगितले.

Web Title: plastic in river polution