समुद्र ओकतोय प्लास्टिक!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

वर्सोव्यात वर्षभरात 4 हजार 200 मेट्रिक टन कचरा

मुंबई- वर्सोवा चौपाटीवर दीड वर्षात प्लास्टिकचा चार हजार 200 मेट्रिक टन कचरा स्वयंसेवकांनी उचलला. पोटात घेतलेले प्लास्टिकच समुद्रकिनाऱ्यावर ओकत असल्याचे हे निदर्शक आहे.

मुंबईच्या किनारपट्टीवर प्लास्टिकचाच सडा आहे. मच्छीमारांच्या जाळ्यांतही माशांऐवजी केवळ प्लास्टिकच गावत असल्याने ते व्यथित आहेत; तर दुसरीकडे किनारपट्टीवरील प्लास्टिकचे ढिगारे उचलण्याचे आव्हान आहे.

दिवसेंदिवस वाढणारे प्लास्टिकचे ढिगारे पर्यावरणासाठी घातक असल्याचे, क्‍लिन वर्सोवा मोहिमेचे अफरोझ शाह यांनी सांगितले. आम्ही शनिवारी-रविवारी सकाळी शंभर स्वयंसेवकांच्या मदतीने किनारपट्टी स्वच्छ करतो. प्लास्टिक फेकण्यासाठी दोन सेकंद लागतात, तर प्लास्टिकची एक वस्तू वाळूतून वेगळी करण्यासाठी स्वयंसेवकांना दहा मिनिटे लागतात, असेही शाह यांनी निदर्शनास आणले.

वर्सोवा चौपाटी प्लास्टिकमय झाल्याचे पाहून शेवटी मीच ढिगारे उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला काही स्वयंसेवकांनी मदत केली. हळूहळू या मोहिमेची व्याप्ती वाढत गेली. आता शंभर स्वयंसेवक क्‍लिन वर्सोवा बीच या मोहिमेत सहभागी आहेत. या मोहिमेला गती मिळाली आहे. मात्र आणखी स्वयंसेवकांची गरज आहे, असे शहा म्हणाले.

केवळ वर्सोवा चौपाटीच नव्हे, तर काही दिवसांत मालाडजवळही आम्ही प्लास्टिकचा कचरा उचलण्याची मोहीम सुरू करणार आहोत. यासाठी अद्ययावत यंत्राची आवश्‍यकता आहे. पालिका आणि आम्ही आमच्या पैशातून हे यंत्र घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---

(फोटो स्मार्टला टाकला आहे. समुद्र प्लास्टिक)

Web Title: plastic in sea