मुंबईत प्लॅस्टिकबंदीचा फज्जा 

मुंबईत प्लॅस्टिकबंदीचा फज्जा 

मुंबई - प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीच्या घोषणेला तीन महिने उलटूनही मुंबईत आजही सर्रास प्लॅस्टिक विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव "सकाळ'च्या पाहणीत दिसून आले. बंदीचे नियम शिथिल केल्याने ती परिणामकारक ठरत नसल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. 

गणेशोत्सवात प्लॅस्टिकच्या पिशव्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. फुले, फळे तसेच भाज्यांसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या बाजारात सहज आढळून येत आहेत. केळी, सफरचंद या फळांना सध्या मागणी आहे. गिऱ्हाईकही या पिशव्यांनाच पसंती देत असल्याची माहिती फळविक्रेते देतात. भाज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांत गुंडाळून सहज विकल्या जात आहेत, असे भाजीविक्रेते सांगतात. नारळपाणी पिण्यासाठीही प्लॅस्टिकचे स्ट्रॉ खुलेआम ठेवल्याचे दिसून आले. लोकलमध्ये समोसे, वडे विकण्यासाठीही हलक्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या दिल्या जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com