दुकानदारांना प्लास्टिकची चिंता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - प्लास्टिकबंदीच्या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशीही बाजारात नकारात्मक चित्र कायम होते. ग्राहकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत बऱ्यापैकी जनजागृती झाली असली तरी दुकानदार मात्र आधीचे प्लास्टिक संपवण्याच्या मनस्थितीत आहेत.

आधीपासून उपलब्ध असलेले प्लास्टिक संपवले नाही तर नुकसानच होईल अशा मानसिकतेतून दुकानांमध्ये  रविवारीही प्लास्टिकचा वापर सुरूच होता. सोमवार (ता. २५) पासून मात्र पालिका अधिकारी कारवाईचा फास आवळणार आहेत.

वह्यांवरील प्लास्टिकची आवरणे, खेळण्यांवरील प्लास्टिक आणि कपड्यांच्या दुकानात शर्ट- पंजाबी ड्रेसला पॅक करण्यासाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक जसेच्या तसे होते. त्याला पर्याय काय वापरावा, असाही संभ्रम दुकानदारांमध्ये होता. अशा प्लास्टिकवर बंदी नाही. असल्यास महापालिकेने तसे लेखी स्वरूपात कळवावे, अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली. केवळ प्लास्टिकची काळी व निळ्या रंगाची पिशवी बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्लास्टिक पिशव्या वापरता येतील अशा गैरसमजुतीत काही दुकानांत त्या दिल्या जात होत्या. प्लास्टिक बंदीविषयीची घोषणा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाली होती. त्याच वेळी उत्पादकांना प्लास्टिकची निर्मिती बंद करण्यास सांगितले असते तर आमचे नुकसान झाले नसते, अशी तक्रारही दुकानदार करत आहेत. विविध मॉल्समधील फूड कोर्टमध्ये थर्माकोल, प्लास्टिकचे ताट-चमचे आदी वस्तू दुकानदारांनी हटवल्या आहेत. त्याऐवजी पत्रावळ्या आणि पुठ्ठ्याचे चमचे दिले जात होते.

Web Title: plasticBan Plastic concerns to shoppers

टॅग्स