esakal | "कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडा"
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan-Railways

"कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडा"

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना या संबंधीचे निवेदन दिले. कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी जातात. त्यांच्यासाठी ही विनंती करण्यात आली आहे. (Please Arrange Additional Special Trains to Konkan from Mumbai during Ganapati Festival Requests BJP MLA Ashish Shelar)

हेही वाचा: लठ्ठपणा होणार कमी, महापालिकेच्या KEM रुग्णालयातील डाॅक्टरांनी बनवले उपकरण!

यावर्षी कोकण रेल्वेने 72 अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पूर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या, असं त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.

हेही वाचा: "संजय राऊत, तुम्हीही हे ध्यानातच ठेवा..."; चित्रा वाघ भडकल्या

या वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजून काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत. सध्याच्या काळात कोकणवासीयांना गेल्या वर्षी गणेशोत्सव आपल्या कोकणातील आप्तेष्टांबरोबर साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदा त्यांना कोकणात जाण्याच्या दृष्टीने असा विचार व्हायला हवा, ही विनंती आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना केली.

loading image