भूखंड देण्याच्या आमिषाने 17 जणांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

कोपरखैरणे - घरासाठी भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून 17 जणांना तब्बल 51 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोन जण फरारी झाले आहेत.

कोपरखैरणे - घरासाठी भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून 17 जणांना तब्बल 51 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोन जण फरारी झाले आहेत.

वाशी येथील एका मॉलमध्ये कार्तिक इंटरप्राईजेस नावाचे कार्यालय होते. त्याचे मालक व त्याची महिला साथीदार यांनी नवी मुंबईत भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला सुरेश पाटील भुलले. त्यांच्यासह त्यांची मेव्हणी व भाचीनेही पैसे भरले. पाटील यांच्यासह आणखी 17 जणांनी सुमारे तीन ते चार लाख रुपये भरले होते; मात्र काही दिवसांनंतर दोघेही आरोपी पळून गेले. या दोघांकडून 1 फेब्रुवारी 2014 पासून 29 नोव्हेंबर 2016 पर्यंत नागरिकांची फसवणूक करण्यात आली; मात्र भूखंड मिळत नसल्याने पाटील यांनी तक्रार केल्यानंतर आरोपींनी पळ काढला. त्यांचा वाशी पोलिस शोध घेत आहेत.

एमबीबीएसला प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक
एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून बंगळूर येथील एका व्यक्तीची तब्बल सहा लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नारायण श्रीनिवास यांच्या मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी ते नवी मुंबईत 24 सप्टेंबरला आले होते. त्या वेळी त्यांना दोन जण भेटले. त्यांनी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून नारायण यांच्याकडून सहा लाख 45 हजार रुपये उकळले. आरोपींनी नारायण यांना प्रतिज्ञापत्रही दिले; मात्र ते बनावट असल्याचे लक्षात आले. काही दिवसांनंतर आरोपींनी फोन उचलण्याबरोबरच भेटण्यासाठी टाळाटाळ केली. त्यानंतर नारायण यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी सीबीडी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Plots of fraud

टॅग्स