'महिला उद्योजकांसाठी एमआयडीसीमध्ये भूखंड'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

मुंबई - महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे राज्य सरकारचे धोरण असून महिला उद्योजकांचे प्रमाण नऊ टक्‍क्‍यांवरून 20 टक्‍क्‍यांवर नेण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) क्षेत्रातील भूखंड उद्योजिकांना देण्यात येतील, असे आश्‍वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. 

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात गुरुवारी (ता. 3) माणदेशी महोत्सवाचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. या समारंभाला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा उपस्थित होत्या. माणदेशी फाऊंडेशनने महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. गाई आणि आई हे समाजाचे मूलभूत घटक आहेत. माणदेशी फाऊंडेशन गाई-गुरांना वाचवण्याचे उल्लेखनीय काम करीत आहे, अशी प्रशंसा सिंधुताई यांनी केली. 

या वर्षी माणदेशी महोत्सवात 90 ग्रामीण उद्योजिकांनी विविध उत्पादने विक्रीसाठी आणली आहेत. मुंबईकरांना सातारा जिल्ह्यातील माणदेशाची ओळख करून देण्यासाठी दीपस्तंभ, किल्ला, चावडी, घराचा ओटा, पडवी, गुरे-ढोरे आदी वैशिष्ट्यांचा देखावा साकारण्यात आला आहे. त्या ठिकाणी नागरिकांना सेल्फी टिपण्याचा अनुभव घेता येईल. 

माणदेशी वानवळा 
मुंबईकरांना महोत्सवात माणदेशी जीन, घोंगडी, जाते, खलबत्ते, केरसुणी, दुरडी, सुपली आदी वस्तू खरेदी करता येतील. गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, चटकदार चटण्या व मसाले असे माणदेशी जिन्नसही उपलब्ध आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plots for MIDCC for women entrepreneurs