मंगेशकर कुटुंबाच्या आशीर्वादानं मी उणीवा भरुन काढण्याचा प्रयत्न करेन - मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"मंगेशकर कुटुंबाच्या आशीर्वादानं माझ्यातील उणीवा भरुन काढेन"

"मंगेशकर कुटुंबाच्या आशीर्वादानं माझ्यातील उणीवा भरुन काढेन"

मुंबई : दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आलेला 'लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार' हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. यासाठी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला हजर झाले असून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटनंही पार पडलं. (PM Narendra Modi come to Mumbai for recived Lata Mangeshkar Award)

 • आशा भोसले : कलाकारांना कालाकार बनवणाऱ्या सर्व रसिकांचे मी आभार मानते.

 • आशा भोसले : दीदी लहानपणी आमच्यासोबत विटी-दांडूचा खेळ खेळायचो. पण त्यानंतर त्यांनी जीवनात लवकरच कामाला सुरुवात केली. एकदा त्यांना खूपच तीव्र ताप आला होता. पण तेव्हाही ती एका कार्यक्रमात गाण गायली. १९४० मध्ये जेव्हा चित्रपटात रेकॉर्डवर गायिकेचं नाव येत नव्हतं कलाकारांचं नाव असायचं. अशाच एका दीदीच्या रेकॉर्डबाबत मी तिला याची जाणीव करुन दिली. तर तीनं सांगितलं की वेळ आल्यावर सगळं ठीक होईल.

 • आशा भोसले : मी स्टेजवर कायम गाण्यासाठी आले पण आता भाषण करत आहे. आम्ही दरसाल इथं वडिलांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी यायचो. पण कसं कधी वाटलं नव्हतं की दीदीच्या नंतर असं इथं यावं लागेल. दीदी खुपच चाणक्य होत्या. कुठं बोलायचं हे त्यांना बरोबर माहिती होतं. मला त्या कायम म्हणायच्या की तू खूपच बोलतेस. आपली प्रतिमा त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं. त्यांना सर्व रंग आवडायचे पण त्यांनी सफेद रंगाच्या साडीलाच कायमचं आपलं केलं. आई-वडिलांवर दीदींचं खूपच प्रेम होतं.

 • PM मोदी : मंगेशकर कुटुंबाच्या आशीर्वादानं मी माझ्यातील उणीवा भरुन काढण्याचा प्रयत्न करेन. मंगेशकर कुटुंबानं मला दिलेल्या या पहिल्या पुरस्कारासाठी मी त्यांचा आभारी आहे.

 • PM मोदी : पूर्व-पश्चिम ते उत्तर-दक्षिणेत लता दादींच्या सुरांनी लोकांना समृद्ध केलं. पुण्यात त्यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्यानं मास्टर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून मोठं काम केलं. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेत मोठं योगदान देण्यात पुण्यातील या रुग्णालयाचा मोठा वाटा होता.

 • PM मोदी : ब्रिटिश व्हाईसरॉयच्या कार्यक्रमात वीर सावकर यांचं गीत दिनानाथ मंगेशकर यांनी गायलं. हे केवळ दिनानाथ मंगेशकरच करु शकतात. सावरकरांनी हे गीत इंग्रजांना आव्हान म्हणून लिहिलं होतं. हा वारसा दिनानाथ मंगेशकर यांनी आपल्या पुढच्या पिढीला दिला. ऐ मेरे वतन के लोगो सारखी गाण्यांनी लोकांच्या मनावर गारूड केलं. लता दीदींची गाणी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवात याचा समवाेश व्हायला हवा.

 • PM मोदी : लता मंगेशकर या वयानं आणि कर्तुत्वानंही मोठ्या होत्या. त्यांच्या आवाजानं ८० वर्षे संगीत क्षेत्रावर आपली छाप सोडली. संगीत क्षेत्रात ग्रामोफोनपासून कॅसेट, सीडी, डीव्हीडी नंतर पेनड्राईव्ह हा काळ त्यांनी पाहिला. संगीत साधना आणि ईश्वराची साधना त्यांच्यासाठी एकच होती.

 • PM मोदी : चाळीस वर्षांपूर्वी सुधीर फडकेंनी माझी आणि लता मंगेशकर यांची भेट घडवून आणली होती. लता दीदी या माझ्या मोठ्या बहिण होत्या. येणाऱ्या राखी पौर्णिमेला लता दीदी नसतील. मला देण्यात येणारा पुरस्कार जर मोठ्या बहिणीच्या नावानं देण्यात येणार असेल तर हा पुरस्कार स्विकारणं माझी जबाबदारी आहे. या पुरस्काराला नकार देणं माझ्यासाठी शक्यतचं नव्हतं. हा पुरस्कार मी सर्व देशवासियांना समर्पित करतो.

 • PM मोदी : संगीत आपल्यात वैराग्य, वीररस, मातृत्व, राष्ट्रभक्ती, कर्तवनिष्ठेच्या शिखरावर पोहोचवू शकतं. आपण सौभाग्यशाली आहोत की संगीताचं हे सामर्थ्य आपण आपल्या लता दीदींच्या स्वरुपात अनुभवलं आहे. त्याचबरोबर मंगेशकर कुटुंबानं पिढ्यानं पिढ्या संगीतासाठी योगदान दिलं आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 • उषा मंगेशकर : लता दीदींच्या नावाचा हा पहिला पुरस्कार आपणं स्विकारला याचं माझ्या कुटुंबियाला आनंद आहे. आमचे वडील गेल्यानंतर १३ वर्षांच्या दीदीचं काम करण्यास सुरुवात केली. १४ वर्षाच्या दीदींनी आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीदिन साजरा करायला सुरुवात केली. या कार्यक्रमांना अनेक दिग्गज गायक कलाकारांनी आपली कला सादर केली. पण पंतप्रधानांना मी धन्यवाद देते की, त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हा पुरस्कार स्विकारण्यासाठी इथं हजेरी लावली.

 • कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंबियांपैकी आशा भोसले, उषा मंगेशकर हे उपस्थित आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते या कार्यक्रमाला हजर राहू शकलेले नाहीत. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही.

 • यावेळी आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिनानाथ मंगेशकर ट्रस्ट आणि या ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची माहिती उपस्थितांना दिली.

 • लता मंगेशकर पुरस्कार सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाचं उद्घाटनं मोदींच्या हस्ते पार पडलं.

Web Title: Pm Narendra Modi Come To Mumbai For Recived Lata Mangeshkar Award

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top