PM Modi : काँग्रेसच्या शहजाद्यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा तिरस्कार केला? पंतप्रधान मोदींचा घणाघात

महायुतीचे कल्याण व भिवंडी लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली.
PM Modi
PM ModiSakal

डोंबिवली - काँग्रेसच्या शहजाद्यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा तिरस्कार केला हे सगळ्यांनी पाहिले. ते चित्र पाहून संपूर्ण महाराष्ट्राला राग आला. पण नकली शिवसेनेनं तोंडाला कुलप लावलं.

डोळ्याला पट्टी बांधली, अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर त्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे केली. हिंमत असेल तर वीर सावरकारांचा मोठेपणा सांगणारी 5 वाक्य शहजाद्यांना बोलायला लावावीत असं माझं नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीला आव्हान आहे असे देखील ते म्हणाले.

महायुतीचे कल्याण व भिवंडी लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.

तसेच महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटावर देखील टिका केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रविंद्र चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सभेत पंतप्रधानांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थेट आव्हान दिले तर काँग्रेसवर टीका सुद्धा केली.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की 'बाळासाहेबांबाबत बोलणारे देखील काँग्रेसचा कुर्ता घेऊन उभे आहेत. काँग्रेस फुटीरतावादी, दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे. नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे. काँग्रेसचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात.

काँग्रेसच्या शहजाद्यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा तिरस्कार केला हे तुम्ही पाहिले आहे ना? ते चित्र पाहून संपूर्ण महाराष्ट्राला राग आला. पण नकली शिवसेनेनं तोंडाला कुलप लावलं. डोळ्याला पट्टी बांधली, अशी टीका मोदी यांनी केली.काँग्रेसचे शहजादे महाराष्ट्राच्या जमिनीवर वीर सावरकरांचा अपमान करतात. त्यांना खडसावण्याची नकली शिवसेनेत हिंमत नाही.

हिंमत असेल तर वीर सावरकारांचा मोठेपणा सांगणारी 5 वाक्य शहजाद्यांना बोलायला लावावीत असं माझं नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीला आव्हान आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं.काँग्रेस कधीही विकासाचा विचार करु शकत नाही. काँग्रेसला मतांसाठी फक्त हिंदू-मुसलमान करणे माहिती आहे. त्यांची खोटी बाजू मी जनतेसमोर आणलीय. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये, असं पंतप्रधानांनी यावेळी मतदारांना आवाहन केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com