पंतप्रधानांची आज आमदारांशी "फोन पे चर्चा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यातील भाजपचे मंत्री आणि आमदारांशी दूरध्वनीवरून चर्चा करणार आहेत. संसदीय परंपरा जपण्याचे आवाहन ते या वेळी करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही ते देणार असल्याचे समजते. 

संसदेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ गुरुवारी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व खासदार उपोषण करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी राज्यातील भाजपचे मंत्री आणि आमदारांशीही चर्चा करणार आहेत. 

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या देशभरात हालचाली सुरू आहेत. राज्यातही भाजपविरोधात विविध आंदोलने होत आहेत. कोरेगाव-भीमामधील हिंसाचार, शेतकरी संप, शेतकरी मोर्चा अशा विविध मुद्द्यांच्या आधारे विरोधकांनी सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक खासदार असलेले राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपसाठी महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान आतापासूनच पक्षाच्या आमदारांना कामाला लावणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: PM talk about phone call with MLAs today