300 रुपयांना विकलेला लॅपटॉप हितेंद्र ठाकूर यांचा भांडाफोड करणार? ईडीचे अधिकारी घेताहेत शोध

300 रुपयांना विकलेला लॅपटॉप हितेंद्र ठाकूर यांचा भांडाफोड करणार? ईडीचे अधिकारी घेताहेत शोध

मुंबईः  ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालय आता भंगारवाल्यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता ईडीचे अधिकारी वसई आणि नालासोपारा भागातील वेगवेगळ्या भंगारवाल्यांची चौकशी करत असल्याचं समजतंय.  भंगारवाल्यांच्या दुकानात आणि गोडाऊनमध्ये जाऊन एक ईडीचे अधिकारी लॅपटॉप शोधत आहे. या भागातील भंगारवाल्यांची चौकशी करण्या मागे देखील एक कारण आहे. 

नेमकी का केली जातेय भंगारवाल्यांच्या दुकानांची झाडाझडती

वसई नालासोपाऱ्यातील बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि आमदार हितेंद्र आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या कार्यालय आणि घर अशा एकूण 5 ठिकाणी अचानक ईडीनं छापे टाकले होते. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणात ठाकूर कुटुंबियांच्या विवा ग्रुपशी व्यवहार झाल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे. 

शुक्रवारी टाकलेल्या या धाडीत विवा ग्रुपचे सीए मदन चतुर्वेदी आणि व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.  या दोघांनी देखील पूर्वीच आपले मोबाईल फॉरमॅट केलेत. या कंपनीच्या व्यवहारातील बरेच डिटेल्स असलेला एक लॅपटॉप अवघ्या 300 रुपयात आपण विकला असल्याची कबूली ईडीसमोर या ग्रुपचे मदन चतुर्वेदी यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा लॅपटॉप मिळवण्यासाठी ईडीनं दोन टीम तयार केल्या आहेत. या टीम वसई विरार भागात आता भंगाराची दुकानं, गोडाऊन आणि शक्य असेल तिथे या लॅपटॉपचा शोध घेण्याचं काम करत आहेत. 

ईडीचे अधिकारी भंगरवाल्यांची चौकशी करत आहेत. त्यामुळे मोठमोठ्या नेत्यांची चौकशी करणारी ई़डी आता भंगरवाल्यांची चौकशी करत आहेत. 

नेमकं प्रकरण काय आहे? 

22 जानेवारीला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे असणाऱ्या विवा ग्रुपवर ईडीचा छापा मारला. विरार पश्चिम रेल्वे स्थानकजवळील हितेंद्र ठाकूर यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर यांचे घर,  विवा होम्स कॉम्प्लेक्समधील कार्यालय आणि यांच्या घरी ईडीनं चौकशी केली. 

हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराचा विवा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे दोघेही पिता पुत्रांचा समावेश नाही. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात  HDIL कंपनीचे मालक राकेश वाधवाण आणि सफाळे येथील नामांकित विकासक प्रवीण राऊत यांना ईडीने अटक करून चौकशी केल्यानंतर ठाकूर परिवाराच्या विवा ग्रुपची भागीदारी  समोर आली होती.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

PMC Bank fraud case MLA Hitendra Thakur ED Viva Group Madan Gopal Chaturvedi laptop

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com