पीएमसी गैरव्यवहार - आरोपींना न्यायालयीन कोठडी

मुंबई ः पीएमसी बॅंकेच्या दोन खातेदारांचा काल मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ बुधवारी खातेदारांनी किल्ला कोर्टाबाहेर आंदोलन केले. (प्रथमेश गडकरी : सकाळ छायाचित्र सेवा)
मुंबई ः पीएमसी बॅंकेच्या दोन खातेदारांचा काल मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ बुधवारी खातेदारांनी किल्ला कोर्टाबाहेर आंदोलन केले. (प्रथमेश गडकरी : सकाळ छायाचित्र सेवा)

मुंबई : पीएमसी बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले "एचडीआयएल'चे वरियाम सिंग, संचालक राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांना 23 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी (ता. 16) महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले. दरम्यान, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही जनहित याचिका करण्यात आली आहे. 

सुमारे चार हजार 335 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बुधवारी किल्ला न्यायालयात तिघांनाही रिमांडसाठी हजर करण्यात आले. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. जी. शेख यांच्यासमोर तिघांना हजर करण्यात आले. बॅंकेच्या असंख्य खातेदारांनी आजही न्यायालयाबाहेर निर्दशने केली. आरोपींना जामीन देऊ नका, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात होती.

आरबीआयने पीएमसी बॅंकेवर निर्बंध घातल्याने खातेदारांच्या आर्थिक व्यवहारांवर मोठी बंधने आली आहेत. याबाबत उच्च न्यायालयात आणखी एक याचिका करण्यात आली आहे. आतापर्यंत आंदोलनातील दोघांचा मृत्यु झाला आहे. गुरुवारी न्यायालयात याचिकेचा उल्लेख करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com