"पीएमआरडीए'च्या अर्थसंकल्पास मंजुरी 

"पीएमआरडीए'च्या अर्थसंकल्पास मंजुरी 

मुंबई - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सन 2019-20 साठीच्या 1722 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या अंदाजपत्रकामध्ये रिंगरोड, नदी सुधार, पाणीपुरवठा, नगर रचना योजना व हायपरलूपच्या विकासकामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. "पीएमआरडीए'च्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पायभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार आहे. प्राधिकरणाने मंजूर केलेला संकल्पना आराखडा हा विकास आराखडा व्हावा, यासाठी नियोजन करावे, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com