PNB बँक गैरव्यवहार प्रकरणः मेहुल चोक्‍सीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर टाच

PNB बँक गैरव्यवहार प्रकरणः मेहुल चोक्‍सीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर टाच

मुंबई:  पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्‍सी आणि गितांजली ग्रुपशी संबंधित सुमारे 15 कोटींच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या मालमत्तांमध्ये मुंबईतील गोरेगाव येथील आलिशान फ्लॅट, मौल्यवान वस्तू, मर्सिडीज कार यांचा समावेश आहे.

गोरेगाव येथील 1460 चौ. फुटांच्या फ्लॅटवर टाच आणण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याच्याशिवाय सोने आणि प्लॅटिनमचे दागिने, हिरे, मोती आणि चांदीचे दागिने, मर्सिडीज कार, महागडी घड्याळे यांचा समावेश आहे. या मालमत्ता गितांजली  ग्रुप ऑफ कंपनी आणि त्यांचे संचालक मेहूल चोक्सी यांच्याशी संबंधित आहेत.

पीएनबी गैरव्यवहारात मेहुल चोक्‍सी यांच्या गीतांजली ग्रुपशी संबंधित कंपन्यासह अन्य कंपन्यांतील अधिकारी गुंतले आहेत. सीबीआयने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध, कट कारस्थान, फसवणूक आदी कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी 512 कोटी रुपयांची देवाणघेवाण केल्याच्या 12 नोंदी सापडल्या आहेत. चोक्‍सीने 7080.86 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.याप्रकरणी यापूर्वीच 2550 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यानंतर आता 14 कोटी 45 लाखांच्या मालमत्तेवरही ईडीने टाच आणली आहे.

लंडनमधील तुरुंगात असलेला आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांच्या 13 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. सक्तवसुली संचालनालयाने चोक्‍सीच्या दोन आणि मोदीच्या 11 गाड्या जप्त केल्या होत्या. त्याचप्रमाणे मोदीकडील दुर्मिळ चित्रांचाही लिलाव करण्यात आला होता. ईडीने 22 फेब्रुवारीला मोदीकडील 100 कोटींपेक्षा अधिक किमतीचे समभाग, ठेवी गोठवून आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. चोक्‍सी आणि मोदी यांनी पंजाब नॅशनल बॅंकेत 13 हजार 570 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

PNB loan fraud case Enforcement Directorate Gitanjali Group  Mehul Choksi assets

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com