मनसेच्या महामेळाव्यासाठी सुरक्षेची जय्यत तयारी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

राज्यात बललेल्या राजकीय समिकरणाच्या पार्श्‍वभुमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसैनिकांत हुंकार फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी येत्या 23 जानेवारी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची तयारी करताना सुरक्षेची जय्यत तयारी केली असून प्रत्येक पदाधिका-याला बारकोड ओळखपत्रे देण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यात बललेल्या राजकीय समिकरणाच्या पार्श्‍वभुमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसैनिकांत हुंकार फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी येत्या 23 जानेवारी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची तयारी करताना सुरक्षेची जय्यत तयारी केली असून प्रत्येक पदाधिका-याला बारकोड ओळखपत्रे देण्यात येणार आहे.

ऑनलाईन चाचणीत महापोर्टल नापास, वाचा संपूर्ण बातमी

 राज्यात शिवसेना- भाजपची युती तुटून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस अशी तीन पक्षांची महाविकास आघाडी निर्माण झाली. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांत शहरी भागात लाभ उठवण्यासाठी भाजपने सारे विसरून मनसे सोबत घरोबा करण्याचे सुतोवाच केले आहे. तर मनसेलाही पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी अशी काही गरज असल्याचे मनसे नेत्यांकडून खासगीत मान्य केले जात आहे. यापार्श्‍वभूमीवर मनसेचा येत्या 23 जानेवारीला गोरेगाव येथील नेस्को मैदानावर महमेळावा आयोजित केला आहे.

राज्यातील अनधिकृत स्कूल बसेस आरटीओच्या रडारवर

या मेळाव्याला राज्यातील कानाकोप-यातून सुमारे दोन लाख मनसैनिक आणण्याचा घाट घातला आहे. यामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्‍न संवेदनशिल बनला आहे. याची खबरदारी घेताना प्रत्येक पदाधिका-यांना त्याच्या नाव, पद, पत्यासह सुरक्षेचे बारकोड असलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे. सुरक्षेसंदर्भातील बारकोड ओळखपत्राचा वापर मनसे पहिल्यांदाच करीत आहे. 23 जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी दहा वाजल्यापासून सायकाळपर्यत ठाण मांडून बसणार आहेत. सायंकाळी राज यांचे भाषण होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for MNS mahamelava