"एस्कॉर्ट'च्या नावाखाली शरिरविक्रीचा अड्डा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

  • दलाल महिलेला अटक;
  • दोन तरुणींची सुटका 

मुंबई : संकेतस्थळावरून एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेला शरीरविक्रयाचा अड्डा पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला आहे. तेथून दलाल महिलेला अटक करून दोन मुलींची सुटका केली, असे पोलिसांनी सांगितले. 

आधी मैत्रिणीला नेलं 'मीनी सी शोवरवर', मग तीला म्हणाले चल घरी जेवायला 

बॉम्बे एस्कॉर्ट सर्व्हिस नावाने संकेतस्थळावर दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे ग्रॅण्ट रोड परिसरातील हॉटेलात शरीरविक्रयासाठी तरुणी पाठवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. त्यानंतर एका बनावट ग्राहकाद्वारे बॉम्बे एस्कॉर्ट सर्व्हिसच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. 

शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी विकृत शिक्षिकेला घेतलं ताब्यात

या बनावट ग्राहकाने केलेल्या मागणीनुसार एक दलाल महिला ग्रॅण्ट रोड परिसरातील त्या हॉटेलात दोन तरुणींना घेऊन आली. त्या वेळी पोलिस पथकाने या तिघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prostitution under the name "Escort" Iin mumbai