esakal | कवितांनी फुलले हास्याचे कारंजे
sakal

बोलून बातमी शोधा

वसई ः हास्यकवी अशोक नायगावकर.

विरार ः ‘टिळक तुम्ही इथे का उभे राहिलात?’, ‘तेव्हा फुकणी फू फू करीत होती’, ‘अशीच कणिक तिंबत राहा तू’, ‘पर्यटन ते पर्यटन’, ‘निवृत्त काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले’, अशा बहारदार कविता सादर करून हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सुवर्णमहोत्सवी विवा कट्टा चांगलाच गाजवला.

कवितांनी फुलले हास्याचे कारंजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विरार ः ‘टिळक तुम्ही इथे का उभे राहिलात?’, ‘तेव्हा फुकणी फू फू करीत होती’, ‘अशीच कणिक तिंबत राहा तू’, ‘पर्यटन ते पर्यटन’, ‘निवृत्त काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले’, अशा बहारदार कविता सादर करून हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सुवर्णमहोत्सवी विवा कट्टा चांगलाच गाजवला.

गिधाडांमुळे बागायतदारांवर संक्रांत

पापडी-वसई येथील हुतात्मा बाळा सावंत स्मारक उद्यानात ही नायगावकर काव्य-हास्य संध्या अशी काही रंगली की, उपस्थित काव्यरसिक दोन तास हास्यरंगात मनसोक्त रंगून गेले.

पाणजे पाणथळीचा ताबा रिलायन्सकडे

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यंग स्टार्स ट्रस्ट, विरार या संस्थेचा एक अंगीकृत उपक्रम म्हणून ओळखला जाणाऱ्या या विशेष कार्यक्रमास माजी महापौर प्रविणा ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर, यंग स्टार्सचे समन्वयक अजीव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कवी नायगावकर यांनी वसई तालुक्‍यातील नैसर्गिक सौंदर्यामुळे आपण नेहमीच इकडे आकृष्ट झालो, भारावून गेलो आणि आनंदी झाल्याचे सांगितले. अनुभवात आलेले काही किस्से त्यांनी आपल्या शैलीत असे काही सादर केले, की रसिकांनी खळखळून हसत त्यांच्या मिष्किलीला टाळ्यांची दाद दिली.

मैफलीचा समारोप करताना नायगावकर म्हणाले, आज अनेकांना वेळ कसा घालवायचा, ही समस्या आहे, तर विभक्त कुटुंबपद्धतीमुळे म्हाताऱ्यांचे काय करायचे, हा काहींचा प्रश्‍न आहे; मात्र खरी ताकद एकत्र कुटुंबपद्धतीतच आहे, असे त्यांनी सांगितले. 

कट्टा मानकरी म्हणून कवयित्री संगीता आरबुने, ज्योती बालिगा राव, डॉ.पल्लवी बनसोडे, उज्ज्वला जैन, प्रतिभा कुलकर्णी, डॉ. सोमनाथ विभुते, ॲड. रमाकांत वाघचौडे, मंगला मांजरेकर यांचा सत्कार झाला. ‘डिंपल पब्लिकेशन’चे अशोक मुळ्ये, प्रा. द. वि. मणेरीकर, प्रकाश वनमाळी, ॲड. ओंकार म्हात्रे, नरेंद्र पाटील, सुदेश चौधरी, सुभाष गोंधळे, दत्तात्रय देशमुख, केवल वर्तक,जयंत देसले, हेमंत राऊत, संदेश जाधव, पुष्पा जाधव या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रम सुरू ठेवण्याची ग्वाही
विवा कट्टा संचालिका स्वाती जोशी यांनी प्रास्ताविकातून कट्टा उपक्रमाच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाचा आढावा घेतला. यंग स्टार्स ट्रस्ट; विरार, वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ आणि महापालिकेच्या मजबूत पाठिंब्यावर हा साहित्य व संस्कृतीविषयक उपक्रम असाच पुढेही चालू राहील, असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला. मकरंद सावे यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

loading image