मुंबई - पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी लादली जात असल्याचे सांगत राज्य पुरस्कार जे कवी हेमंत दिवटे यांनी राज्य सरकारकडून त्यांना कवितासंग्रहासाठी मिळालेला पुरस्कार सरकारला परत करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयावर साहित्यिक, मराठी भाषा प्रेमींकडून सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे.