या तालुक्‍यात नगरपंचायत फेरनिवडीत नवीन चेहऱ्यांना संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

पोलादपूर नगर पंचायत सभापती फेरनिवड शुक्रवारी दुपारी नगर पंचायत कार्यालयात झाली. २०२१ नगर पंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वांना योग्य न्याय मिळावा, या दृष्टिकोनातून ही निवड करण्यात आली. 

पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर नगर पंचायत सभापती फेरनिवड शुक्रवारी दुपारी नगर पंचायत कार्यालयात झाली. २०२१ नगर पंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वांना योग्य न्याय मिळावा, या दृष्टिकोनातून ही निवड करण्यात आली. 

सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन योग्य संधी देत समन्वय साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. नगर पंचायतीच्या सभापती निवडीमध्ये पहिल्या तीन टप्प्यांमध्ये कोणतेही पद न भूषवलेले नगरसेविका संगीता इंगवले यांना महिला व बालकल्याण सभापतिपदी निवड करण्यात आली. तर माजी नगराध्यक्ष नीलेश सुतार यांची पुन्हा पाणीपुरवठा सभापतिपद आणि प्रकाश गायकवाड यांची पुन्हा बांधकाम सभापतिपदी निवड करण्यात आली.

संजय राऊत उद्या बेळगावात... पाहू काय घडतंय...

तिसऱ्या टप्प्यात नगराध्यक्ष ओबीसी आरक्षणामध्ये इच्छुक असणाऱ्या कल्पना सवादकर यांना अंतिम टप्प्यात उपनगराध्यक्षपदी इच्छुकता होती. त्यांना अर्थ नियोजन व शिक्षण सभापतिपद देण्यात आले.

या वेळी सभापती फेरनिवड प्रक्रियेला नगरसेविका सुनीता पार्टे, प्रसन्न बुटाला, उमेश पवार, राजन पवार, नागेश पवार, अश्विनी गांधी, सिद्धीका लोखंडे आदी उपस्थित होते. 

अबब..! अार्थिक मंदीतही मद्यविक्री ‘झिंगाट’

दरम्यान, सर्वत्र खरी चर्चा रंगली आहे ती नगराध्यक्षपदी कोणते पवार विराजमान होणार याची? कारण नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उमेश पवार, राजन पवार व नागेश पवार हे तिन्ही पवार ठाम आहेत. याबाबत शिवसेना पक्ष नेतृत्वाकडून जो निर्णय दिला जाईल, तो सर्वमान्य असणार आहे, असेदेखील ठामपणे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poladpur Nagarpanchayat Election