New Year 2023 : नवीन वर्षाच्या स्वागत करताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 156 तळीरामावर पोलिसांकडून कारवाई.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police action against 156 people drink and drive New Year 2023

New Year 2023 : नवीन वर्षाच्या स्वागत करताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 156 तळीरामावर पोलिसांकडून कारवाई....

मुंबई : मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या स्वागत करताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 156 तळीरामावर कारवाई केली आहे. तर 66 जणांवर बेशिस्तपणे वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली.

तसेच हेल्मेट न वापरता मोटारसायकल चालवल्याबद्दल 2465 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे . 31 डिसेंबरला नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा ते रविवारी पहाटेपर्यंत वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. नियम न पाळणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यांवर चेक पॉईंट उभारले होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवल्याबद्दल 2465 लोकांवर कारवाई करण्यात आली.ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 156 तळीरामावर कारवाई केली आहे.

तर 66 जणांवर बेशिस्तपणे वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तसेच हेल्मेट न वापरता मोटारसायकल चालवल्याबद्दल 2465 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे . दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल 274 चालकांना चालान देण्यात आली.

ट्रॅफिक सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 679 वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली. तसेच नो-पार्किंग भागात उभी असलेली 3087 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली .