पोलिसांनी काढला ‘उतारा’!

पोलिसांनी जप्त केलेली वाहने.
पोलिसांनी जप्त केलेली वाहने.

नवीन पनवेल : मद्यप्राशन करून वाहन चालविताना पोलिसांच्या हाती लागलेल्या वाहनचालकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता गेले चार दिवस पनवेल तालुक्‍यात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते. ‘थर्टीफर्स्ट’च्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या कारवाईत खारघरमध्ये ५०; तर कळंबोलीतून ४६ वाहने जप्त करण्यात आली. नववर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी कारवाई केल्याने तळीरामांची धुंद उतरली.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली होती. याबाबत मद्यपान करून वाहन न चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. यापूर्वी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध नव्हती. 

आता ब्रेथ ॲनालायझरची सुविधा उपलब्ध असून, वाहतूक पोलिसांची संख्यासुद्धा वर्षागणिक वाढविण्यात येते आहे. पनवेल तालुक्‍यात मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी वेळोवेळी विशेष मोहिमा हाती घेण्यात येतात. गटारी अमावास्या, नववर्ष स्वागत पार्टी यासह इतर वेळी मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येते.

आरोपींचे परवाने होणार जप्त 
कळंबोली फायर ब्रिगेड, रोडपाली, कामोठा सिग्नल, खांदा कॉलनी, कळंबोली सर्कल या ठिकाणी पहाटे ५ वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली. कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश खेडेकर यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी कर्तव्य बजावत होते. ब्रेथ ॲनालायझरद्वारे ही कारवाई करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर खटले दाखल केले जाणार आहेत. तसेच त्यांचे परवाने जप्त करून आरटीओकडे रद्द करण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत.वर्षभरात परिसरात कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश खेडेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com