बेपर्वा दोन हजार नागरिकांवर पोलिसांची कारवाई, संचारबंदीच्या आदेशानंतर मुंबई पोलिस ऍक्शन मोडमध्ये

अनिश पाटील
Thursday, 24 December 2020

संचारबंदीच्या आदेशानंतर वाहतुक पोलिसांनी शहरात दोन हजारांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई केली.

मुंबई : संचारबंदीच्या आदेशानंतर वाहतुक पोलिसांनी शहरात दोन हजारांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई केली. उल्लंघनांमध्ये हेल्मेट घालणे, सीटबेल्ट न वापरणे, विना परवाना वाहन चालवणं आणि मास्क न घालणं अशांचा समावेश होता.

राज्य सरकारनं रात्री संचारबंदीचा जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर मुंबई पोलिस संपूर्ण शहरभर मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसले. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.  वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केल्यामुळे चालानची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, पोलिसांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, वरळी सीफेस आणि बँडस्टँड अशा जागांवर दक्षता वाढवली आहे. या अंतर्गतच 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आला आहे. UK, इटली आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारामुळे संचारंदीलागू करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी : TRP प्रकरणात 15 वी अटक, बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सध्याच्या नियमांचं पालन केल्यास टॅक्सी, कार आणि ऑटो रिक्षांना रात्री चालवण्याची परवानगी आहे. कार्यालय आणि आवश्यक कर्मचारी पूर्वीप्रमाणे काम करतील. कारण प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मास्क न घालणाऱ्या पब आणि रेस्टॉरंट्समध्येही पालिकेनं एक मोठी मोहीम राबविली आहे. तर कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करमाऱ्या क्लब मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत पब आणि नाईटक्लब उघडण्यासाठी सध्याची अंतिम वेळ 11 पर्यंत आहे.

मात्र, पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पहाटे चार वाजेपर्यंत नाईटक्लब कार्यरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याचा परिणाम म्हणून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तर काही चालकांकडून दंड वसूल केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या 4 मोठ्या पब्सवर कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा | Marathi news from Mumbai  

( संपादन - सुमित बागुल )

police in action mode after curfew declared mumbai police took action on two thousand citizens


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police in action mode after curfew declared mumbai police took action on two thousand citizens