TRP प्रकरणात 15 वी अटक, बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक

TRP प्रकरणात 15 वी अटक, बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक

मुंबई : TRP गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने बार्क (BARC) च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला रायगडमध्ये अटक केली आहे. फेक TRP प्रकरणातील ही 15 वी अटक असून त्याला उद्या म्हणजे शुक्रवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

पार्थो दासगुप्ता असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रायगड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पुणे ग्रामीणमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना रात्री मुंबईत आणण्यात येणार आहे. भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौंसिल (BARC ) ही संस्था भारतीय माहीत व प्रसारण मंत्रालय (MIB) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांच्या अधिपत्याखाली काम करते.

BARC या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास 3 हजार बॅरोमीटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते. त्याद्वारे विविध चॅनेल्सना टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स म्हणजेच TRP आकडेवारी दिली जाते. 

BARC ने दिलेल्या रेटिंग्जनुसार जाहिरातदार प्रसारित कार्यक्रमांमध्ये जाहिराती देत असतात.  टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते.

याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी भादंवि कलम 409, 420, 465, 468, 406, 120 (ब), 201, 204, 212 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. आतापर्यंत याप्रकरणी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे . TRP प्रकारांतील ही 15 वी अटक आहे. 

BARC former CEO Partho Dasgupta arrested in TRP scam action by raigad police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com