Crime
sakal
मुंबई : अमली पदार्थांच्या नशेत बेहोश होत, नववर्ष स्वागताचा पायंडा मुंबईसारख्या महानगरांमध्ये गेल्या काही वर्षांत रूढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तमाम सुरक्षा यंत्रणांनी अमली पदार्थ उत्पादक, वितरक, वाहक, विक्रेत्यांच्या संघटित टोळ्या रडारवर घेतल्या आहेत. विशेष म्हणजे नाताळ ते ३१ डिसेंबरपर्यंत शहरात आयोजित सार्वजनिक, खासगी कार्यक्रमांवर या यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहेत.