ठाणे : दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने कडक बंदोबस्त लावला आहे. ठाणे पोलिसांच्या जोडीला अतिरिक्त कुमक यावेळी गणेश मंडळ ते विसर्जन स्थळापर्यंत तैनात असणार आहे. साध्या वेशात पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. मिरवणुकीसह विसर्जन घाटांवर या वेळी १०५ ड्रोनची नजर असून अनुचित प्रकार घडणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.