कॅमेरे चोरावर गुन्हेशाखेची झडप

दिनेश गोगी
बुधवार, 25 जुलै 2018

उल्हासनगर : कल्याणच्या एका फोटो स्टुडिओचे शटर उघडून त्यातून पावणेदोन लाख रुपयांचे कॅमेरे चोरणाऱ्या चोरावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण पोलिसांनी अवघ्या चार दिवसातच झडप घातली आहे. या प्रकरणी नरेश ओचानी याच्यावर झडप घातली. त्याच्याकडून मोठा व्हिडीओ कॅमेरा व इतर कॅमेरे असा पावणेदोन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.

कल्याण मध्ये असलेल्या संगम फोटो स्टुडिओचे शटर उघडून त्यात असलेले कॅमेरे व इतर साहित्य चोराने 10 तारखेला चोरून नेले होते. स्टुडिओ मालक गावी गेलेला होता. गावावरून परत आल्यावर कॅमेरे चोरून नेल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी 20 तारखेला खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कल्याणच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

तितक्यातच उल्हासनगर गुन्हे अन्वेषणला कॅम्प नंबर 4 ओटी सेक्शन मधील इमारतीत एकाकडे कॅमेरे असल्याची खबर मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेंद्र पवार, उदय पालांडे, संजय माळी, रामचंद्र जाधव, बाबूलाल जाधव, जगदीश कुलकर्णी, दादा भोसले यांनी काल 24 तारखेच्या रात्री ओटी सेक्शन मधील इमारतीच्या परिसरात सापळा रचला. आणि नरेश ओचानी याच्यावर झडप घातली. त्याच्याकडून मोठा व्हिडीओ कॅमेरा व इतर कॅमेरे असा पावणेदोन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. त्याने किती ठिकाणच्या फोटो स्टुडिओ मधून कॅमेरे चोरी केलेत याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

Web Title: police arrested for camera thief