मुंबई : एका खासगी कंपनीच्या कार्यकारी संचालकाच्या नावे १०.४१ कोटींना आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या पाच साथीदारांना पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. ५.७५ कोटी सायबर भामट्यांच्या खिशात जाण्यापासून रोखण्यातही पोलिसांनी यश मिळवले..देशभर मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे संचलन करणाऱ्या कंपनीच्या लेखा विभागाच्या उपमहाव्यवस्थापकाला अनोळखी क्रमांकावरून विविध बँक खात्यांमध्ये १०.४१ कोटी रुपये जमा करण्याबाबत मेसेज प्राप्त झाला. व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या प्रोफाईलवर कंपनीच्या कार्यकारी संचालकांचा फोटो होता. उपमहाव्यवस्थापकाने ही रक्कम पाठवली. पुढे या उपमहाव्यवस्थापकाने कार्यकारी संचालकाकडे लेखा नोंदींसाठी व्यवहारांची बिले मागितली असता ही फसवणूक उघडकीस आली..Mumbai Crime: प्रेयसीसोबत मुंबई फिरायला आला, पण तरुणानं अचानक टोकाचा निर्णय घेतला; इमारतीत गेला अन्... मुंबईत भयंकर घटना.कंपनीने सायबर पोलिस ठाण्यात (दक्षिण विभाग) तक्रार दाखल केली. याच व्यवहारातील काही रक्कम दिल्लीतील बैंक शाखांमध्ये वळते झाले होते. त्यातील रक्कम काढून घेण्यासाठी दोन तरुण बैंक शाखेत आले. दिल्ली पोलिसांनी सर्व बँकांना संशयास्पद व्यवहारांसाठी आलेल्या व्यक्तींचो माहिती कळवावी, अशी सूचना केली. दिल्ली पोलिसांनी विकास व वंश अशी नावे असलेल्या तरुणांना ताब्यात घेतले. चौकशी आधारे पोलिसांनी फैयाज आलम (२२), अमित कुमार (२८), बलवीर कुमार यांना अटक केली. मुख्य आरोपी रंजन कुमार फरार आहे..Mumbai Coastal Road: भाईंदर कोस्टल रोड विस्तार होणार, प्रकल्पाला अखेर मंजुरी; पण मुंबईकरांवर भार .सर्व खाती गोठवलीसायबर पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच तातडीने ६३ बँक व्यवहारांचे तपशील मिळवत संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून रक्कम जमा झालेली सर्व खाती गोठवून घेतली. त्यामुळे फसवणूक रकमेतील ५.७५ कोटी रुपये भामट्यांच्या हाती पडता पडता राहिले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.