इराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी नागरिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना आंबिवली रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. या हल्ल्यात दोन अधिकारी आणि तीन पोलिस जखमी झाले असल्याचे समजते. 

कल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी नागरिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना आंबिवली रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. या हल्ल्यात दोन अधिकारी आणि तीन पोलिस जखमी झाले असल्याचे समजते. 

सोनसाखळी चोरीतील वॉण्टेड आरोपी अब्बासी शाजोर इराणी हा आंबिवली येथील इराणी काबिल्यात लपल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी येथे छापा टाकत पोलिस या आरोपीला ताब्यात घेऊन निघाले असता वडवली रेल्वे फाटकाजवळ गाडी थांबली. या वेळी दबा धरून बसलेल्या इराणी टोळीने गाडीवर दगडफेक करत अब्बासी याला घेत पळ काढला. मात्र, पुन्हा पोलिसांनी फरार आरोपी व दोन हल्लेखोरांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. 

35 जणांवर गुन्हा 
याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंत पाटील यांनी फिर्याद नोंदवली आहे. स्त्री आणि पुरुषांच्या जमावाने अटक केलेल्या आरोपीला बेकायदेशीरित्या सोडवण्याच्या उद्देशाने पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करत लाकडी दांडक्‍याने गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुख्य आरोपी अब्बासी याच्यासह अली इराणी, मुहम्मद इराणी यांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 30 ते 35 हल्लेखोरांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: On the police attackers are arrested