लाचेच्या सापळ्यात अडकलेला पोलिस धक्काबुक्की करुन पळाला

crime
crime

उल्हासनगर - एका भंगारवाल्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारल्याबद्दल हिललाईन ठाण्यातील पोलिसाला अटक करण्यासाठी आलेल्या अँटिकरप्शनच्या अधिकाऱ्यालाच धक्का मारून लाचेच्या रकमेसह पोलिस पळून गेला. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पोलिसाचे नाव पदमाकर आसवले असून, त्याच्यावर लाच स्वीकारण्या सोबत सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅम्प नंबर 5 परिसरात एका तरुणाचा अधिकृत भंगाराचा व्यवसाय असून, त्याच्या अनेक भंगाराच्या गाड्या येत-जात असतात. हिललाईन पोलिस त्याच्या गाड्या अनेकदा थांबवून व चिरीमिरी घेऊन गाड्यांना सोडून देत होते. मात्र तीन आठवड्यापूर्वी हिललाईन ठाण्याचे पोलिस पदमाकर आसवले यांनी भंगारवाल्याला गाठून स्वतःसोबत अधिकाऱ्यांसाठी दरमहा 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. हे अती होत असल्याने भंगारवाल्याने ठाणे अँटिकरप्शन ऑफिस गाठून उपअधीक्षक महेश पाटील यांच्याकडे 15 ऑक्टोबर रोजी आसवले यांची तक्रार केली. महेश पाटील यांनी मोबाईलवर येणारे आसवले यांचे कॉल रेकोर्ड करण्याचे भंगारवाल्याला सांगितले. त्यानुसार आसवले करत असलेले मोबाईल रेकोर्ड करताना 80 हजारा ऐवजी 50 हजार देण्याची तयारी दर्शवली व ही माहिती भंगारवाल्याने उपअधीक्षक महेश पाटील यांना दिली.

काल गुरुवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्वेला 50 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार उपअधीक्षक महेश पाटील यांच्या सोबत त्यांच्या टीमने सापळा रचला. मोटरसायकलवर आलेल्या पदमाकर आसवले यांनी भंगारवाल्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच, महेश पाटील यांनी आसवले यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. आसवले याने पाटील यांना मोटरसायकलने हुल देऊन व धक्का मारून लाचेच्या रकमेसह पळ काढला. रात्री उशिरापर्यंत अँटिकरप्शनचे पथक हिललाईन ठाण्यात ठाण मांडून होते. याप्रकरणी महेश पाटील यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार आसवले यांच्यावर लाचेची रकम स्विकारणे व धक्का मारून पळ काढताना सरकारी कामात अडथळा आणणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com