राज्यभरात आतापर्यंत फक्त 'इतक्या' खासगी बसची तपासणी; राज्यात अवैध वाहतूकविरोधी मोहीम..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

लाॅकडाऊनच्या काळात गुजरात, राजस्थानमधील वाहनांतून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे पुढे आल्यानंतर राज्य परिवहन आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

मुंबई: लाॅकडाऊनच्या काळात गुजरात, राजस्थानमधील वाहनांतून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे पुढे आल्यानंतर राज्य परिवहन आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आतापर्यंत फक्त 178 बसगाड्यांची तपासणी झाली असून, 50 वाहने जप्त करण्यात आले आहेत. त्यात ई-पास आणि परमिट नसलेल्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे उघड झाले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाॅकाडाऊन झाल्यानंतर मुंबईसह राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक बंद आहे. याचा गैरफायदा घेऊन गुजरात आणि राजस्थानमधून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक सुरू होती. खासगी वाहतूकदार विना ई-पास, विनापरमिट बसगाड्या चालवत होते. प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते आणि प्रवाशांची जादा वाहतूक केली जात होती. त्यावर कारवाई होत नसल्याने मुंबई मोटर वाहन संघटनेनेच या वाहनांची धरपकड सुरू केली होती. 

कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

त्यामुळे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची  तारांबळ उडाली. अनेक तक्रारी आल्यावर परिवहन आयुक्तांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, राज्यासह सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांच्या तपासणीचा देखावाच होत असल्याचा आरोफ केला जात आहे. त्यामुळे परप्रांतीय अवैध प्रवासी वाहतूकदारांना वाचवण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फक्त 25 वाहनांची तपासणी:

राज्यातील सीमा तपासणी नाक्यांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. 2015 मध्ये तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी ट्रकचालक बनून आच्छाड सीमा तपासणी नाक्यावर छापा टाकला होता. त्यावेळी सुमारे 22 लाख रुपये अतिरिक्त आढळल्यामुळे ठाणे विभागाच्या आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. राज्यातील 22 सीमा तपासणी नाक्यांवरून दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असताना 15 जूनपासून फक्त 25 वाहनांची तपासणी करण्यात आल्याचे समजते.

ठिकाण  तपासलेली वाहने जप्त वाहने  परमिट नाही  ई-पास नाही  जादा प्रवासी 
मुंबई महानगर

54

15 21 34 11
राज्यातील एकूण 99 33 41 55 25
सीमा चेक पोस्ट 25 2 9 7 3
एकूण 178 50 71 96 39

"मुंबई बसमालक संघंटनेने गेल्या तीन दिवसांत सुमारे 175 वाहने पकडून दिली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अशा अनेक वाहनांना आरटीओ अधिकाऱ्यांनी समज देऊन सोडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाहने परप्रांतीय असल्याने आता जप्तीची कारवाई कशी करणार? नाशिकमधील पेठ सीमा तपासणी नाक्यावरून छुप्या मार्गाने अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे," असे मुंबई बसमालक संघंटनेचे सरचिटणीस हर्ष कोटक यांनी म्हंटलंय. 

जून महिन्यातही दुकानदारांचा व्यवसाय थंडच; लॉकडाऊन शिथिल करूनही परिस्थितीत सुधार नाही.. 

"प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई केली. त्यामुळे सर्व मार्गांवरील अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली आहे", राज्य परिवहन विभागाचे उपायुक्त  पुरुषोत्तम निकम यांनी म्हंटलंय.  

police checked only 178 private buses till now 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police checked only 178 private buses till now