जून महिन्यातही दुकानदारांचा व्यवसाय थंडच; लॉकडाऊन शिथिल करूनही परिस्थितीत सुधार नाही.. 

shop
shop

मुंबई: सरकारने लॉकडाऊन शिथील केल्यावरही देशभरातील लहानमोठ्या दुकानदारांचा व्यवसाय अजूनही थंडच असून गेल्यावर्षीच्या जून च्या तुलनेत त्यांना मोठा तोटा झाल्याचे दिसून आले आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने देशात सर्वत्र सर्वच मॉल-शॉपिंग सेंटर खुले करावेत, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. 

सुमारे सत्तर दिवसांच्या लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने जून महिन्यात बिगर अत्यावश्यक बाबींची दुकाने, मॉल-शॉपिंग सेंटर उघडण्यास संमती दिली. तरीही वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसारच त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे दिल्लीसारख्या राज्यात मॉल-शॉपिंग सेंटर उघडली तरी महाराष्ट्रात ती बंदच आहेत. मात्र जिथे ही अन्य दुकाने उघडली आहेत, तेथेही येण्यास ग्राहक घाबरत असल्याने या दुकानदारांचा व्यवसाय घटला आहे. रीटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने नुकत्याच केलेल्या पहाणीत ही बाब समोर आली आहे. 

एक ते पंधरा जूनदरम्यान देशातील लहानमोठी दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर यांचा व्यवसाय कसा झाला याबाबत असोसिएशनने पहाणी केली. गेल्या जूनच्या तुलनेत या जूनमध्ये मॉल च्या व्यवसायात 77 टक्के तर मोठ्या दुकानांच्या धंद्यात 61 टक्के घट झाली. रेस्टोरंटमध्ये येणारे खवय्ये 70 टक्के कमी झाले तर कपडेविक्री 69 टक्क्यांनी कमी झाली. दागिने, घड्याळे आदी वैयक्तिक वापराच्या बाबींचा खपही 65 टक्के कमी झाला. 

फर्निचर, अन्नधान्य-वाणसामान, ग्राहकोपयोगी वस्तू यांचा धंदा थोडाथोडा सावरतो आहे. या वस्तू विकणाऱ्या मोठ्या दुकानांच्या व्यवसायात 14 टक्के वाढ झाली पण याच वस्तू विकणाऱ्या छोट्या दुकानांचा व्यवसाय 33 टक्के कमी झाल्याचे निरीक्षणही असोसिएशनने नोंदवले आहे.

पश्चिम भारतातील मॉल चा सरासरी व्यवसाय 74 टक्के कमी झाला. तर उत्तर भारतात हेच प्रमाण 71 टक्के होते, पूर्व आणि दक्षिण भागातील मॉलच्या व्यवसायात अनुक्रमे 63 व 59 टक्के घट नोंदवली गेली. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय दुकानदार योजत आहेत. 

मात्र देशभरात सर्वत्र दुकाने उघडण्यासाठी एकसारखे नियम नाहीत. त्यामुळे सरकारने सर्वत्र सर्व दुकाने, मॉल आदींना व्यवसायाची संमती द्यावी, असे असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले.

no customers in stores even in june 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com