तोतया पोलिसांना बसणार लगाम! अधिकारी, अंमलदारांना एनएफसी-क्यूआरयुक्त नवी ओळखपत्रे मिळणार
Police Commissionerate Action : पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : भविष्यात पोलिस असल्याचे भासवून नागरिकांच्या सहज फसवणुकीला चाप बसणार आहे. प्रत्येक अधिकारी, अंमलदारांना अद्यावत इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र देण्याचा निर्णय अलीकडेच पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे.