
Coastal Road Accident
ESakal
मुंबई : मुंबईतील वरळी सी-लिंकवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. VIP बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे पोलिस दलात शोककळा पसरली असून पुढील तपास सुरू आहे.