वाहनतळांवर सीसी टीव्ही बसवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

मुंबई - एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची कमला मिलच्या पार्किंगमध्ये हत्या झाल्यानंतर आता अशा वाहनतळांवर सीसी टीव्ही लावण्यासाठी पोलिस मॉल्स व कॉर्पोरेट कार्यालयांशी संपर्क साधणार आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यासही सांगितले जाणार आहे. 

संघवी यांची हत्या झालेल्या ठिकाणी सीसी टीव्ही नव्हते. येथे एकच सुरक्षा रक्षक होता. त्यामुळे येथे सुरक्षा वाढवण्याबाबत एन. एम. जोशी मार्ग पोलिस संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी विनंती करणार आहेत. शहरातील प्रमुख मॉल्स, आस्थापनांच्या सुरक्षेची तपासणी केली जाणार आहे. त्यात त्रुटी आढळल्यास त्यांना तसे कळविले जाणार आहे. स्थानिक उपायुक्तांवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. 

वाहनतळावरील निर्जनस्थळी तरी सीसी टीव्ही लावण्यात यावा. त्यामुळे संघवी यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

याशिवाय कमला मिल पार्किंग तळाच्या प्रवेशद्वारावरील सीसी टीव्ही कमी क्षमतेचे असल्यामुळे आरोपी सर्फराजसोबत कारमध्ये आणखी कोणी बसले होते का, हे स्पष्ट होत नाही. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: police contact malls and corporate offices to set up CCTV