मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

काटेचापाडा (आटगाव) येथील पीडितेची आई दुसऱ्या पतीसोबत राहते. ती मोलमजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करते. आरोपीने खाऊचे आमिष दाखवून; तसेच जीवे मारण्याची धमकी देत दोन महिन्यांपासून या सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे समजल्यावर आईने तत्काळ शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

खर्डी, : शहापूर तालुक्‍यातील आटगाव येथील आदिवासी पाड्यावर सावत्र बापाने दोन महिन्यांपासून 15 वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

काटेचापाडा (आटगाव) येथील पीडितेची आई दुसऱ्या पतीसोबत राहते. ती मोलमजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करते. आरोपीने खाऊचे आमिष दाखवून; तसेच जीवे मारण्याची धमकी देत दोन महिन्यांपासून या सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे समजल्यावर आईने तत्काळ शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात भादंवि कलम 376, 506 प्रमाणे लहान मुलांचे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Police custody of a stepfather for child girl Harassment