लोकलच्या धडकेत रेल्वे पोलिसाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - लोकलमधून पडलेल्या प्रवाशाला शोधण्यासाठी गेलेल्या रेल्वे पोलिसाचा लोकलखाली सापडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (ता. 24) रात्री घडली. सुरेश वसंत पाटील (वय 56) असे या पोलिसाचे नाव आहे. ते अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात काम करत होते.

पाटील यांनी तीन वर्षांत अनेक बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधून काढले होते. यासाठी नुकताच त्यांना "स्टार कॉप्स द मंथ' हा पुरस्कारही मिळाला होता. सोमवारी ते रात्रपाळीला होते. विलेपार्ले-अंधेरी स्थानकांदरम्यान एक प्रवासी खाली पडल्याची माहिती त्यांना मिळाली. स्टेशनमास्तर आणि हमालासह पाटील त्या प्रवाशाला शोधण्यासाठी गेले. अंधारात शोध घेत असताना समोरून आलेल्या लोकलखाली ते सापडले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Web Title: police death by local dash