
आव्हाडांंचं एक ट्वीट आणि पवारांविरोधात बोलणारा पोलिसांच्या ताब्यात
मागील काही दिवसांपासून राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून राजकीय गदारोळ सुरू आहे. शरद पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोलेबाजी सुरू झाली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दांत ट्वीट केलं. (Jitendra Awhad tweet)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात या व्यक्तीने ट्वीट केलं होतं. 'बारामतीचा गांधी' असा यामध्ये उल्लेख करण्यात आला. तसेच या गांधीसाठी गोडसेची गरज असल्याचं प्रक्षोभक ट्वीट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्याचा स्क्रिनशॉट शेअर केला.
यासोबतच त्यांनी संबंधित विचारसरणीच्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलीस अॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी हे प्रक्षोभक ट्वीट करणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. निखील भामरे असं या व्यक्तीचं नाव असून दिंडोरी पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय.
Web Title: Police Detained A Boy Tweeted Against Sharad Pawar Jitendra Awhad Tweet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..