BIG NEWS - 'राजगृह'वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पोलिस म्हणतात...

सुमित बागुल
Tuesday, 14 July 2020

मुंबईतील दादरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर अगदी काहीच दिवसांपूर्वी भ्याड हल्ला झाला.

मुंबई - मुंबईतील दादरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर अगदी काहीच दिवसांपूर्वी भ्याड हल्ला झाला. यामध्ये एका इसमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराच्या खिडक्यांची आणि घराच्या परिसरातील कुंड्यांची मोठया प्रमाणात तोडफोड केली होती. या भ्याड हल्ल्यानंतर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' भोवती २४ तास पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय. 

याप्रकरणी सुरवातीपासून आरोपीबाबत CCTV च्याही माध्यमातून तपास सुरु आहे. या वव्यक्तीने केलेली तोडफोड CCTV मध्ये कैद झालीये. अशातच आता मुंबई पोलिसांनाया प्रकारांतील मुख्य आरोपीबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समाजलीये. सदर मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे, मात्र पोलसांना हा आरोपी दादर ते ठाणे चालत गेल्याची माहिती मिळालीये. 

मोठी बातमी - वाढीव वीजबिलांविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यालयाने दिला निकाल, हायकोर्ट म्हणतंय...

पोलिसांना काय आढळून आलं ? 

पोलसांच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झालीये. राजगृहावर हल्ला करणारा आरोपी हा दादरवरून थेट चालत ठाण्यात आल्याचं समजतंय. ठाण्यातील तीन हात नाका या चौकातील CCTV कॅमेऱ्यांमध्ये ही व्याक्ती पुन्हा एकदा कैद झालीये. ठाण्याच्या तीन हात नाका चौकातून हा आरोपी पुढे भिवंडीच्या दिशेने गल्ल्याचंही समजतंय. सदर आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात जरी नसला तरीही लवकरात लवकर त्याला बेडया ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांना आहे. 

मुख्य आरोपी अद्याप मोकाट :

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्तकांसाठी खास 'राजगृह' हे घर बांधलं. या निवासस्थानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी दररोज येत असतात. याच घरावर ७ जुलै रोजी भ्याड हल्ला झाला होता. काही तरुणांनी या निवासस्थानाच्या काचा फोडल्या होत्या सोबतच परिसरातील कुंड्यांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.

INSIDE STORY : संशोधनातून आली नवीन माहिती समोर, TB ची लस करते कोविड संक्रमण आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी...

याप्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान दोघांनी हल्ला केल्याचं निष्पन्न झालंय. या पार्श्वभूमीवर कारवाई करत पोलिसांनी ९ जुलै रोजी एकाला ताब्यातही घेतलंय. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव उमेश जाधव असं आहे, तो ३५ वर्षांचा आहे. हा आरोपी बिगारी म्हणून काम करतो. मात्र नोंदवलेल्या जबाबानंतर मुख्य आरोपी अजूनही मोकाट असल्याचं समजतंय. हे कृत्य का केलं याबाबत अजून कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही. 

police investigation reviles important information about man who vandalized rajagruha at dadar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police investigation reviles important information about man who vandalized rajagruha at dadar